मुलींसाठी “कमवा आणि शिका” योजनेअंतर्गत एखादे युनिट सुरू करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली : श्री अंबिका शिक्षण मंडळ संचालित श्री बाळासाहेब गुरव महाविद्यालय, कवठे महांकाळ आयोजित सेवा पंधरवडामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गुरव यांनी नुकतीच वयाची ७५ वर्षे पूर्ण केली असून, त्यांचा गौरव करत त्यांना देखील यावेळी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

संस्थेने मुलींसाठी “कमवा आणि शिका” योजनेअंतर्गत एखादे युनिट सुरू करण्याचे आवाहन याप्रसंगी पाटील यांनी केले. तर समाजाच्या उभारणीत ज्येष्ठ नागरिकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली.
या कार्यक्रमास भाजपा नेते पृथ्वीराजबाबा पाटील, संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गुरव, वैभव गुरव, विद्यमान अध्यक्षा शितल गुरव, मिलिंद कोरे, नगराध्यक्ष रणजित घाडगे, भाजपा तालुका अध्यक्ष उदयनराजे भोसले, विजय कोरे आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.