मराठवाडा अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सढळ हाताने मदत करा – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी : मराठवाड्यातील अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उभ्या पिकांचे पाणी वादळ-वाऱ्यामुळे पूर्णपणे नष्ट झाले असून शेतकऱ्यांपुढे गंभीर संकट उभे राहिले आहे. घरे, जनावरे, शेतीसाठी घेतलेले कर्ज आणि उदरनिर्वाहाची साधने यावरही मोठा आघात झाला आहे. या कठीण प्रसंगी राज्य सरकारने पीडित शेतकरी व कुटुंबांना मदतीचा हात देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र ही लढाई शासनाच्या बळावरच नव्हे, तर समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन लढणे आवश्यक आहे. म्हणूनच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सढळ हाताने योगदान देण्याचे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
या आपत्तीसमयी शासनाने तातडीची मदत जाहीर केली असली, तरी एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी हीच आज या संकटग्रस्तांसाठी आशेची किरण आहे. प्रत्येक व्यक्ती, संस्था, उद्योगसमूह आणि स्वयंसेवी संस्थांनी या निधीत सढळ हाताने योगदान द्यावे, असे आवाहन ही श्री राणे यांनी केले आहे.
अतिवृष्टीने आपत्तीग्रस्तांना मदत देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा तपशील –
Account Name : Chief Minister’s Relief Fund
Account Number : 10972433751
IFSC Code : SBIN0000300
अथवा सोबतचा QR code scan करून देखील मदत देऊ शकता.