मिरज येथे आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता दौडीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला सहभाग… दौडीच्या निमित्ताने एक वेगळे चैतन्य आणि ऊर्जा मिळाली – चंद्रकांत पाटील

सांगली : नवरात्रोत्सवात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दुर्गामाता दौड आयोजित केली जाते. आज मिरज येथे आयोजित करण्यात आलेल्या दौडीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, शिस्तबद्ध नियोजन, हजारो धारकरी, आणि “जय भवानी, जय शिवाजी” च्या गजरात देशभक्तीची पद्ये आळवताना एक आगळे स्फुरण चढले. या दौडीत ध्वजधारी होण्याचा सन्मान मिळाल्याने एक वेगळाच आनंद झाला.
या दौडीच्या निमित्ताने एक वेगळे चैतन्य आणि ऊर्जा मिळाली. भक्तिरसाबरोबरच वीररसाची निर्मिती करणारा हा उपक्रम निरंतर सुरु राहावा, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
शिवप्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी होणारी सांगलीची दुर्गामाता दौड केवळ महाराष्ट्रातच नाही तर गोवा, कर्नाटक आणि मध्यप्रदेशातही साजरी केली जाते. सांगलीत 1985 पासून सुरु झालेल्या या दौडीची परंपरा यंदा ही सुरू असून अनेक तरुण यात सहभागी होतात.