नामदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकार करणाऱ्या मुला-मुलींचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

13

पुणे : श्री भगवती सेवा आश्रम व जीवन कौशल्य विकास बाणेर संस्थेच्या पुढाकारातून गणेशोत्सव काळात २० वस्त्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकार करणाऱ्या मुला-मुलींचा सत्कार समारंभ दसऱ्याच्या मुहूर्तावर संपन्न झाला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

या स्तुत्य उपक्रमाबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन करताना चंद्रकांत पाटील यांनी मुला-मुलींना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच भगवती माता मंदिरात दर्शन घेऊन आईचे आशीर्वाद घेतले.

यावेळी उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, गणेश कळमकर, प्रकाशतात्या बालवडकर, मोरेश्वर बालवडकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.