भारतीय जनता पार्टी पुणे ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

पुणे : भारतीय जनता पार्टी पुणे ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यात आला तसेच भावी कार्ययोजना ठरविण्यात आल्या.
बैठकीत संघटनात्मक कामकाज, स्थानिक विकासाच्या गरजा तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या अपेक्षा यांवर सविस्तर चर्चा झाली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीसंदर्भात यावेळी आढावा घेण्यात आला.
या प्रसंगी भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, गणेश भेगडे, प्रदीप कंद, चंद्रशेखर वेढणे, माजी आमदार संग्राम जगताप, संग्राम थोपटे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि मंडल अध्यक्ष उपस्थित होते.