सिटी शेरपा” या संस्थेच्या वतीने प्रदर्शनाचे आयोजन… दिवाळीच्या निमित्ताने आपण सर्वांनी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठीच्या या उपक्रमाला बळ देणे आवश्यक – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी “सिटी शेरपा” या संस्थेच्या वतीने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले . या प्रदर्शनास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांनी तयार केलेल्या वस्तूंच्या खरेदीचा आनंद घेतला. तसेच या स्तुत्य उपक्रमाबद्दल संयोजकांचे अभिनंदन केले.

येऊ घातलेल्या दिवाळीच्या निमित्ताने आपण सर्वांनी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठीच्या या उपक्रमाला बळ देणे आवश्यक असल्याची भावना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
सिटी शेरपा तर्फे ज्येष्ठ नागरिकांची सकारात्मकता, जगण्याची उर्मी आणि ताकद यांचे प्रदर्शन आहे. आशिष गार्डन हॉल, DP रोड, कोथरूड, पुणे येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.