सुभाष गुरप्पा जेऊर उर्फ आण्णा यांचे निधन… संघ विचाराला वाहून घेतलेला निस्सीम स्वयंसेवक आम्ही त्यांच्या रूपाने गमावला – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बलराम शाखेचे ज्येष्ठ स्वयंसेवक,नरवीर तानाजी वाडीचे ग्रामस्थ सुभाष गुरप्पा जेऊर उर्फ आण्णा यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन. यांच्या निधनाचे वृत्त आम्हा सर्वांसाठी वेदनादायी असल्याच्या भावना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे माजी अध्यक्ष, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि समर्पित स्वयंसेवक सुभाषजी जेऊर यांच्या निधनाचे वृत्त आम्हा सर्वांसाठी वेदनादायी आहे. संघ संस्कार जगलेल्या आणि संघ संस्कार जागवलेल्या जेऊर यांचे संघ शताब्दी दिनी संचलनात आणि संघ स्वयंसेवक गणवेशात निधन झाले. अखेरच्या क्षणापर्यंत ते शिस्तबद्ध स्वयंसेवक होते. संघ विचाराला वाहून घेतलेला निस्सीम स्वयंसेवक आम्ही त्यांच्या रूपाने गमावला. त्यांची उणीव सदैव भासत राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो, ही ईश्वर चरणी प्रार्थना. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना जेऊर कुटुंबियांच्यासोबत असल्याच्या भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.
सुभाष गुरप्पा जेऊर म्हणजे भारतीय जनता पार्टीचा विचार घरोघरी पोहोचविण्यासाठी अतिशय प्रतिकूल परिस्थिती कार्यरत असलेले व्यक्तिमत्व ! पार्टीचा विचार घरोघरी पोहोचवण्यात त्यांना महत्त्वाचा वाटा उचलला.