आत्मनिर्भर भारतासाठी तरुणाईचा हा पुढाकार आश्वासक आहे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारत साकारण्यासाठी तरुण पिढी पुढे येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील अक्षय तळशिलकर आणि अश्विनी दाते ह्या दोन तरुणांनी आत्मनिर्भर भारतच्या चळवळीत आपलेही योगदान असावे; यासाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर “अलाईव्ह” नावाने कोथरुडकरांनी तयार केलेल्या वस्तूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाला भेट देऊन चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, आत्मनिर्भर भारतासाठी तरुणाईचा हा पुढाकार आश्वासक आहे. समस्त तरुणाईने या चळवळीत योगदान द्यावे, आणि देशाला प्रगतीपथावर न्यावे, अशी अपेक्षा यानिमित्ताने पाटील यांनी व्यक्त केली.