श्रीनाथ सोशल फाउंडेशन आणि माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या माध्यमातून नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिवाळी साहित्य वाटप संपन्न

13

पुणे :बाणेर येथे आज श्रीनाथ सोशल फाउंडेशन आणि माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या माध्यमातून दिवाळी साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

दिवाळी साहित्य वाटप कार्यक्रमास चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. हवामान खात्याने अंदाज वर्तवला होता कि, हि यावर्षी पाऊस समतोल असेल. पण निसर्ग असा आहे कि, ज्याचा अंदाज कोणाला देता येत नाही.यंदाच्या वर्षी प्रचंड पाऊस झाला. मराठवाडयातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला. सोलापूर, सांगली मध्येही काहीप्रमाणात फटका बसला. यामध्ये प्रचंड नुकसान झाले. सरकारने यासाठी चांगल्या पॅकेजची घोषणा केली आहे. ज्योती कळमकर, गणेश कळमकर, अमोल बालवडकर, यांसारख्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या खांद्याला खांदा लावून मोठ्या प्रमाणावर धान्य गोळा केले, कपडे गोळा केले. सरकारकडून जेवढी मदत शक्य असेल ती देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती यावेळी पाटील यांनी दिली.

यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, श्रीनाथ भिमाले, नगरसेवक अमोल बालवडकर, कार्यक्रमाचे संयोजक तथा भाजपा नेते गणेश कळमकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.