प्रसिद्ध सिने अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या कल्पकतेतून “कमवा आणि शिका” उपक्रमाला गती मिळेल – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : ‘कमवा आणि शिका’ तत्वावर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या “यशस्वी ग्रुप”‘चे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीणजी तरडे यांची नियुक्ती झाली आहे. शनिवारी संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात याची घोषणा करण्यात आली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहत प्रवीणजींचे अभिनंदन करुन त्यांना आणि संस्थेला शुभेच्छा दिल्या.
प्रवीणजींच्या कल्पकतेतून “कमवा आणि शिका” उपक्रमाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, यशस्वी ग्रुपचे विश्वेश कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
कमवा आणि शिका” ही एक शिक्षण योजना आहे, जी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना पैसे कमवण्याची संधी देते. या योजनेचा उद्देश गरीब आणि मागासलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत करणे हा आहे. ‘कमवा आणि शिका’ उपक्रम कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आला आणि आज अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये तो राबवला जातो.