भाजपा नेते अमोल बालवडकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मराठवाड्यासाठी ‘आपुलकीची दिवाळी’ साजरी केली… मराठवाड्यातील १५ हजार कुटुंबांना दिवाळी साहित्य केले वाटप

पुणे : यंदा अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील जनतेवर मोठं संकट ओढवलं आहे. दिवाळी हा आनंदाचा सण असूनही अनेक कुटुंबांवर दुःखाचं सावट पडलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते अमोल बालवडकर यांनी “आपुलकीची दिवाळी” साजरी करण्याचा सुंदर निर्णय घेत, मराठवाड्यातील १५ हजार कुटुंबांना दिवाळी साहित्य वाटप केले. या उपक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन अमोल बालवडकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
अमोल बालवडकर यांनी ‘आपला मराठवाडा सेवा संघ’ उभारून मराठवाड्याच्या नागरिकांसाठी स्थायी व्यासपीठ निर्माण केले आहे.” असे बोलून चंद्रकांत पाटील यांनी सदरील उपक्रमाचे कौतुक केले.
या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे-पाटील,भाजपा कोथरुड उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, ज्ञानेश्वर तापकीर यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सुस, सोमेश्वरवाडी आणि म्हाळुंगे परिसरात राहणाऱ्या मराठवाड्यातील कष्टकरी, कामगार बांधवांसह पूरग्रस्त कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने सुमारे १५,००० कुटुंबांना दिवाळी सरंजाम वाटप करून आपुलकीची दिवाळी साजरी करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “सण साजरा करताना सामाजिक जबाबदारी विसरू नका” या संदेशाला प्रतिसाद देत हा उपक्रम राबविण्यात आला. याद्वारे सामाजिक बांधिलकीचे प्रभावी उदाहरण घालून देण्यात आले असून मराठवाड्यातील नागरिकांच्या आनंदात भर टाकण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.