माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा नेते किरण दगडे पाटील यांच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना दिवाळी साहित्य वाटप

पुणे : दिवाळीचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचावा, यासाठी भाजपा नेते आणि माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या माध्यमातून कोथरुड परिसरातील गरजू कुटुंबांना दिवाळी साहित्य वाटप करण्यात आले.
या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, आमदार हेमंत रासने, आमदार भीमराव तापकीर, प्रसिद्ध अभिनेते प्रवीण तरडे यांच्यासह अनेक मान्यवर व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या संयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
किरण दगडे पाटील यांच्यावतीने प्रभागातील नागरिकांना गेल्या दहा वर्षांपासुन दिवाळी सरंजाम भेट देण्यात येते. यावेळी रावसाहेब दानवे पाटील यांनी सर्वांशी संवाद साधुन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. अडचणी, संकटं, कोरोना महामारी काहीही आलं तरी दिवाळीचं सरंजाम वाटप थांबल नाही… यासाठी त्यांनी किरण दगडे पाटील आणि सहकाऱ्यांचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.