नामदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमध्ये आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाचा घेतला आस्वाद… सर्वांना दिवाळीच्या दिल्या मनःपूर्वक शुभेच्छा

पुणे : दिवाळीच्या उत्साहात कोथरुडमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विविध दिवाळी पाहात, सुरेल गाण्यांची मैफल यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे दौऱ्यादरम्यान विविध उपक्रमांना भेटी दिल्या.
दीपावली सणाचा गोडवा वाढविण्यासाठी कोथरुड मतदारसंघातील भाजप महिला मोर्चा कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्षा अमृता देवगावकर आणि भाजप नेते विशाल रामदासी यांनी दिवाळी पहाटचा कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच दिवाळीच्या पहाटेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी युवा सुराज्य प्रतिष्ठानच्या वतीने पद्मश्री व्यंकटेश कुमार यांच्या भक्तीमय स्वरावलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध संतूर वादक शंतनू गोखले यांनी आपल्या वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले होते. या दोन्ही कार्यक्रमांना चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती राहत कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. तसेच, सर्वांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाचे संयोजक पुनीत जोशी, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.