सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ करण्यास अधिकृत मंजुरी…. हा क्षण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानास्पद – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली : लोकभावनांचा सन्मान करत आणि भारतीय संस्कृतीचा वारसा जपत, मोदी सरकारने सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. हा निर्णय केवळ नावबदल नाही, तर हिंदू अस्मिता, भारतीय संस्कृती आणि आपल्या ऐतिहासिक परंपरेचा गौरव पुनर्स्थापित करणारा आहे, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली कि, गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांकडून या नामांतराची भावनिक मागणी केली जात होती. या मागणीला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपा-महायुती सरकारने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा केला. आज ही मागणी पूर्णत्वास जाऊन ईश्वरपूर या नावाने ओळख निर्माण झाली आहे हा क्षण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानास्पद आहे!
हिंदू अस्मिता आणि सांस्कृतिक गौरव जपणाऱ्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानले.