आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने छोटा आणि मोठा पडदा गाजवणारे चतुरस्त्र अभिनेते सतीश शाह यांचे निधन… चरित्र अभिनेता आणि खुसखुशीत विनोदी भूमिका ते खऱ्या अर्थाने जगले – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : चित्रपट आणि दूरदर्शनवरील लोकप्रिय अभिनेते सतीश शाह यांचे निधन. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने छोटा आणि मोठा पडदा गाजवणारे चतुरस्त्र अभिनेते सतीश शाह यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. आपल्या सहजसोप्या आणि हलक्याफुलक्या अभिनयाने त्यांनी असंख्य भूमिका जिवंत केल्या. विशेषतः चरित्र अभिनेता आणि खुसखुशीत विनोदी भूमिका ते खऱ्या अर्थाने जगले. हिंदी मालिका आणि चित्रपटाबरोबरच मराठी चित्रपटातूनही त्यांनी आपल्या अभिनयाचे दर्शन घडविले. त्यांचा सहजसोपा अभिनय रसिकांच्या सदैव स्मरणात राहील. सतीश शाह यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो, ही प्रार्थना, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.
सतीश शाह यांनी त्यांच्या कारकिर्दीत असंख्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण सराभाई VS साराभाई या टीव्ही शोमध्ये साराभाई, ज्याला इंदू अशी ओळख निर्माण झाली. या भूमिकेनं त्यांची ओळख देशभरातली घराघरात पोहोचली आणि ते लोकप्रिय झाले. या शोमध्ये सतीश यांच्या अभिनायाचे विशेषकरून कौतुक केलं गेलं. भगवान पऱशुराम हा त्यांच्या पहिला चित्रपट होता. त्यानंतर तो अरविंद देसाई की अजीब दास्तान, गमन, उमराव जान, शक्ती, जाने भी दो यार, विक्रम बेताल, हम आपके है कौन सारख्या हिंदी सिनेमातून ते चर्चेत आले होते.