कोथरुडमधील केळेवाडी परिसरातील नागरिकांसाठी नामदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून सस्नेह मेळाव्याचे आयोजन
				पुणे : दिवाळीचा उत्साह आणि आनंद साजरा करण्यासाठी सोमवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघातील केळेवाडी परिसरात नागरिकांसाठी सस्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते.
यावेळी उपस्थित नागरिकांशी चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधत सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून केळेवाडीतील लेकींना सायकली भेट देण्यात आल्या.

चंद्रकांत पाटील आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेला सदैव तत्पर असतात. नागरिकांना सुख सुविधा पुरविण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत असतात. अशा प्रकारचे कार्यक्रम राबवणे हे एक निमित्तच म्हणायला लागेल जेथे गरीब आणि गरजू नागरिकांना एखादी भेटवस्तू दिली जाते जी त्यांना नक्कीच उपयुक्त ठरते.
या प्रसंगी भागातील नागरिक आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.