माजी नगरसेविका वृषाली मोरे, भाजपा पिंपरी विधानसभा अध्यक्ष कैलास कुटे आणि बूथ प्रमुख महेश डाखवे यांच्या निवासस्थानी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली सदिच्छा भेट
पिंपरी-चिंचवड, ०८ नोव्हेंबर : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १५ मधील माजी नगरसेविका वृषाली मोरे, भाजपा पिंपरी विधानसभा अध्यक्ष कैलास कुटे आणि बूथ प्रमुख महेश डाखवे यांच्या आकुर्डी मधील निवासस्थानी आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.

या भेटीत दोन्ही कुटुंबियांसोबत चंद्रकांत पाटील यांनी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्याकडून मिळालेल्या स्नेह, आदरातिथ्य आणि आपुलकीबद्दल मनःपूर्वक आभार त्यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी आ. उमाताई खापरे, अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, सदाशिव खाडे, केशव घोळवे, डॉ. संजीवनी पांडे, मोरेश्वर शेडगे, शैलेश मोरे, जयदीप खापरे, शैलेजा मोरे, अनिता वाळुंजकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.