कर्तव्य फाऊंडेशन आणि भारतमाता सत्संग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे आयोजित “अबीर गुलाल उधळत रंग” हा भक्तिसंगीत कार्यक्रम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

79

चिंचवड : आषाढी एकादशीच्या मंगलप्रसंगी कर्तव्य फाऊंडेशन आणि भारतमाता सत्संग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे “अबीर गुलाल उधळत रंग” या भक्तिसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होत विठ्ठल गीतांचा आनंद लुटला.

यावेळी देव, धर्म आणि देश याबाबत तरुण पिढीत अभिमान जागवण्यासाठी भारतमाता फाउंडेशनकडून सलग १००० आठवडे आरती घेण्याचा उल्लेखनीय उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमासाठी सत्संग मंडळाचे विश्वस्त प्रशांत हरहरे आणि त्यांच्या समर्पित टीमचा विशेष सन्मान यावेळी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमास राज्यस्तरीय लेखा समितीचे माजी अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, कर्तव्य फाऊंडेशनचे संचालक मंदार देशपांडे, भाजपा पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष शत्रुघ्न काटे, गायक पं. कृष्णेंद्र वाडीकर (हुबळी) तसेच अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.