हिंदुत्वाच्या ध्येयासाठी, तसेच नगर पालिका निवडणुकीत महायुतीला भक्कम विजय मिळवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे – मंत्री चंद्रकांत पाटील
सांगली : नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे गेले दोन दिवस सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सरसेनापती अशोकराव विरकर यांच्या ईश्वरपूरमधील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांच्या आशीर्वादाने पुढील कार्यासाठी प्रेरणा घेतली.

या भेटीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी सर्व धारकऱ्यांसोबत संवाद साधत, हिंदुत्वाच्या ध्येयासाठी, तसेच नगर पालिका निवडणुकीत महायुतीला भक्कम विजय मिळवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प यावेळी सर्व धारकऱ्यांनी दृढ केला.
या कार्यक्रमास आमदार सदाभाऊ खोत, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक,सांगली महापालिका प्रभारी शेखर इनामदार, राहुल महाडिक, स्वरुपराव पाटील यांच्यासह भाजपा आणि महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.