मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री म. नि. प्र. जडयेसिद्धेश्वर महास्वामीजींच्या ७९व्या पुण्यस्मरणोत्सवानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस केले विनम्र अभिवादन
कोल्हापूर : मुरुगूड आणि गडहिंग्लज नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीतील महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान पाटील यांनी गडहिंग्लज प्रवासात श्री म. नि. प्र. जडयेसिद्धेश्वर महास्वामीजींच्या ७९व्या पुण्यस्मरणोत्सवानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले.
समाजजागृती, अध्यात्म आणि मानवसेवेतील स्वामीजींचे योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे पाटील म्हणाले. यानंतर महालिंगेश्वर मठ, शिरसंगी (जि. बेळगाव) येथील श्री. नि. प्र. बसव महांत. महास्वामीजींचे आशीर्वाद घेतले. आध्यात्मिक तेज, सेवाभाव आणि समाजहिताचा मार्ग दर्शवणाऱ्या या संतपरंपरेसमोर नतमस्तक होऊन प्रेरणा मिळाली असल्याचेही पाटील म्हणाले.
यावेळी भाजपा नेते संजय घाटगे, नाथाजी पाटील, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच महायुतीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.