मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गडहिंग्लज नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ
कोल्हापूर : गडहिंग्लज नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काळभैरव व आई महालक्ष्मीच्या आशीर्वादाने तसेच महात्मा बसवेश्वर आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून संपन्न झाला.

या प्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधताना माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशात आणि राज्यात विकासाच्या गतीला एक नवा आयाम मिळत असून, नगर परिषदेतही महायुतीचे सरकार आल्यास विकासकामांना अधिक वेग मिळेल, कोणतीही अडचण उरणार नाही, हे स्पष्ट करत सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी भाजपा नेते संजय घाटगे, नाथाजी पाटील, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगाधर हिरेमठ तसेच महायुतीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.