कोथरूडमध्ये दिव्यांग सेवा सहाय्यता अभियानाचा शुभारंभ मंत्री चंद्रकांत पाटील आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न
पुणे : कोथरूडमध्ये दिव्यांग सेवा सहाय्यता अभियानाचा शुभारंभ आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून आणि भारत विकास परिषद, मिशिलिन, इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स, फ्यूप्रो, समुत्कर्ष सोशल फाउंडेशन आणि तार्क फाउंडेशन यांच्या संयुक्त सहयोगातून करण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

सामाजिक कार्य हे प्रातिनिधिक न राहता सर्वसमावेशक आणि अमर्याद असावे, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली. समाजहितासाठी अनेक दानशूर व्यक्ती सढळ हाताने मदत करण्यास सदैव पुढे येतात, हेही यावेळी त्यांनी नमूद करण्यात केले.
कार्यक्रमाला भारत विकास परिषदेचे दत्ताजी चितळे, राजेंद्र जोग, सुनील लोढा, निमिष मिश्रा, लक्षणा सक्सेना, माजी नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, वृषाली चौधरी, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, भाजपा कोथरूड दक्षिण मंडळ अध्यक्ष कुलदीप सावळेकर, पुणे शहर चिटणीस प्रा. अनुराधा एडके, गायत्री लांडे, ॲड. प्राची बगाटे, अपर्णा लोणारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.