महिलांच्या प्रगतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या उपक्रमांना अधिक बळ देण्यासाठी भाजपाच्या उमेदवारांना विजयी करा – मंत्री चंद्रकांत पाटील

46

पुणे  : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ आज सासवड दौऱ्यावर आहेत. येथील भागातील सर्व माता-भगिनींशी पाटील यांनी संवाद साधत भाजपाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महिला सक्षमीकरणाला नेहमी सर्वोच्च प्राधान्य देतात. सुकन्या समृद्धी योजना, उज्ज्वला योजना, स्वयं-सहाय्यता गट बळकटीकरण, तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यांसारख्या उपक्रमांमुळे असंख्य महिलांना आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सबलीकरणाचा मजबूत आधार मिळाला आहे.

महिलांच्या प्रगतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या या उपक्रमांना अधिक बळ देण्यासाठी भाजपाच्या उमेदवारांना विजयी करा, असा ठाम संदेश पाटील यांनी यावेळी माता-भगिनींना दिला. यावेळी उपस्थित महिलांनीही भाजपाला एकमुखाने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला, हीच खरी ताकद असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला माजी आमदार संजय जगताप, भाजपा नेते बाबाराजे जाधवराव, सासवड नगर परिषदेच्या भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आनंदीकाकी जगताप, दीप्ती सुर्यवंशी, ज्ञानेश्वर गिरमे, अजित जगताप तसेच भाजपाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.