पुणे पुस्तक महोत्सव काळात ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत!’ याचा होणार विक्रम; त्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

10

पुणे : पुणे विद्यापीठात तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांची बैठक संपन्न झाली. या बैठकीस उच्च व तंत्र षिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, संचालक कर्नल युवराज मलिक, उच्च शिक्षण विभागाचे शैलेंद्र देवळाणकर, पराग काळकर, कुलसचिव ज्योती बाकरे, ज्योत्सना एकबोटे, संजय चाकणे, बागेश्री मंठाळकर यांच्यासह इतर मान्यवर आणि सर्व संस्थांचे संस्थाचालक उपस्थित होते.

यंदा पुणे पुस्तक महोत्सव काळात ‘शांतता पुणेकर वाचत आहेत!’ यांचा विक्रम होणार आहे. यंदा या उपक्रमातून गिनीज विश्व विक्रम नोंदवण्याचा संकल्प करण्यात आला आहे; त्यासाठी सर्वांचे योगदान असावे अशी सूचना चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत केली.

वाचन संस्कृतीला नवे बळ देत पुण्याला ‘पुस्तकांची राजधानी’ बनवण्याच्या उद्देशाने पुणे पुस्तक महोत्सव आणि नॅशनल बुक ट्रस्ट यांच्या वतीने येत्या ९ डिसेंबरला ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा अनोखा उपक्रम शहरभर राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सुमारे ५ लाखांहून अधिक पुणेकर पुस्तक वाचून विश्वविक्रम प्रस्थापित करणार असून, त्यासाठी सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या महाअभियानासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन, पुणे महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि समर्थ युवा फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. पुणे पुस्तक महोत्सव हा पुणेकरांचा उत्सव झाला आहे. यंदा ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमातून विश्वविक्रम नोंदविण्याचा मान पुण्याला मिळणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.