नामदार चंद्रकांत पाटील यांच्या विकासनिधीतून मंजूर झालेल्या विविध कामांचा शुभारंभ उत्साहात संपन्न
पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विकासनिधीतून मंजूर झालेल्या विविध कामांच्या शुभारंभाचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. प्रभाग क्रमांक १ धर्मवीर संभाजी चौक, पाषाण परिसर आणि प्रभाग क्रमांक ९ पंचशील नगर, पाषाण भागातील ड्रेनेज लाईन बांधकामांना ९० लाख रुपये प्रत्येकी असा निधी मंजूर आहे. पाषाणगाव पंचशीलनगर येथील छत्रपती संभाजी महाराज चौक ते काळे एलाईट या दरम्यानच्या ड्रेनेज लाईन कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमाला मंडळ अध्यक्ष लहू बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, सचिन पाषाणकर, प्रकाशतात्या बालवडकर, राहुल कोकाटे, मोरेश्वर बालवडकर, सचिन दळवी, प्रमोद कांबळे, उत्तम जाधव तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
शुभारंभ कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सोबतच कोथरूड विधानसभा उत्तर मंडळाचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि प्रतिनिधीही या वेळी उपस्थित होते. विकासकामांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीमुळे परिसरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार हे नक्की.