महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधान परिषदेचे सभापती, विधानसभेचे अध्यक्ष यांची संसदीय कार्यमंत्री या नात्याने घेतली भेट
नागपूर : नागपूर येथे आजपासून महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानभवनातील त्यांच्या कार्यालयात श्री गणेश मूर्तीची पूजा करून कामकाजाची सुरुवात केली. पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधान परिषदेचे सभापती, विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषद उपसभापती यांची संसदीय कार्यमंत्री या नात्याने भेट घेतली.
आज महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन २०२५ च्या पहिल्या दिवशी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची संसदीय कार्यमंत्री या नात्याने भेट घेतली. यासोबतच विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांची देखील संसदीय कार्यमंत्री या नात्याने त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी एक छोटी भेट देखील त्यांना दिली.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या विधानसभेच्या कामकाजास ‘वंदे मातरम्’ व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने आज सुरूवात झाली. यावेळी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित ‘वंदे मातरम’ या गीतास १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सभागृहात ‘वंदे मातरम’ गीताचे संपूर्ण गायन करण्यात आले.