उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि परमपूज्य सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या पवित्र स्मृतींना केले अभिवादन
नागपूर : नागपूर येथे सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यानिमित्ताने आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रेशीमबाग, नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार जी आणि परमपूज्य सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, डॉ. हेडगेवार यांच्या राष्ट्रभक्ती, शिस्त, संस्कार आणि संघटनात्मक विचारधारेतून समाजात सकारात्मक परिवर्तन घडून आले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ झाली असून सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या प्रक्रियेला भक्कम दिशा मिळाली आहे. आजही त्यांचे विचार व कार्य समाज आणि राष्ट्रासाठी मार्गदर्शक ठरत आहेत.
27 सप्टेंबर 1925 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. यंदाच्या विजयादशमीला शंभर वर्ष पूर्ण झाली. या १०० वर्षांत संघाची सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे समाजाने संघाच्या कार्यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेणे. समाजाच्या प्रगतीसाठी संघाचे स्वयंसेवक अविरतपणे काम करत आहेत.