कोल्हापुरात भाजपचे ‘मिशन महापालिका’ सुरू! चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आगामी रणनीतीवर सखोल चर्चा
कोल्हापूर : आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. मंगळवारी कोल्हापूर येथे भारतीय जनता पक्षाची एक अत्यंत महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महापालिकेत भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सूक्ष्म नियोजन आणि आगामी रणनीतीवर सखोल चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी निवडणूक प्रभारी आ. अतुलबाबा भोसले, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांसह भाजपचे जिल्हास्तरीय प्रमुख पदाधिकारी आणि कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत निवडणूक तयारी, संघटन अधिक बळकट करणे, बूथस्तरीय नियोजन तसेच आगामी रणनीतीवर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीमुळे कोल्हापूर भाजपमध्ये चैतन्याचे वातावरण असून, निवडणुकीच्या पूर्वतयारीमध्ये भाजपने आता मोठी आघाडी घेतली आहे.