कोल्हापुरात महायुतीचा प्रचाराचा धडाका; प्रभाग १९ मध्ये चंद्रकांत पाटील यांनी साधला मतदारांशी थेट संवाद

59

कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या नेत्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रभाग क्रमांक १९ मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला आणि त्यांनी केलेल्या विकासकामांना अधिक बळ देण्यासाठी कोल्हापूरकरांनी महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले. कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील, असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “विकास आणि सुशासन” या मुद्द्यावर मते मागितली जात आहेत. यावेळी पाटील यांनी प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला यासर्वांशी संवाद साधून त्यांनी प्रभागातील समस्या जाणून घेतल्या. तसेच महायुतीला आपला आशीर्वाद द्यावा, असे आवाहन केले.

प्रभाग १९ मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. राहुल चिकोडे, सौ. मानसी लोळगे, सौ. रेणूताई माने आणि श्री. विजयसिंह खाडे-पाटील यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी मोठी रॅली काढली होती. याप्रसंगी महायुतीचे विविध पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.