सांगलीच्या शाश्वत विकासासाठी महायुती कटिबद्ध; कुपवाडमधील जाहीर सभेत चंद्रकांत पाटील यांचा निर्धार
सांगली : सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपा, रिपाइं (आठवले गट) आणि जनसुराज्य महायुतीने आपला प्रचाराचा वेग वाढवला आहे. प्रभाग क्रमांक १, कुपवाड येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.
यावेळी भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री व महानगरपालिका निवडणूक प्रभारी मकरंद देशपांडे, जयश्री वहिनी पाटील, शेखर इनामदार, शरद लाड, दिपकबाबा शिंदे, पैलवान दिलीप सूर्यवंशी, धनंजय सूर्यवंशी, तसेच भाजपाचे सर्व उमेदवार, पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या सभेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “सांगलीच्या सर्वांगीण, शाश्वत आणि लोकाभिमुख विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे. शहराच्या पायाभूत सुविधांपासून ते जनसामान्यांच्या प्रश्नांपर्यंत सर्वच आघाड्यांवर आम्ही ठोस काम करणार आहोत.” या सभेला महिलांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरला, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. नागरिकांच्या वाढत्या सहभागामुळे सांगलीत महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.