परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व गुन्हेगारांवर धाक निर्माण करण्यासाठी गस्त वाढवा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली.या बैठकीत कायदा व सुव्यवस्था स्थितीचा आढावा घेण्यात आला तसेच स्थानिक उद्योजकांशी संवाद साधण्यात आला.
यावेळी पाटील यांनी कामगारांची सुरक्षा लक्षात घेता, औद्योगिक क्षेत्रातील सर्व कामगारांचे प्रथम टप्प्यात KYC, आणि नंतरच्या टप्प्यात चारित्र्य पडताळणी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व गुन्हेगारांवर धाक निर्माण करण्यासाठी गस्त वाढवण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या.

यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, मिरजचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, स्थानिक गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, माझे विशेष कार्यकारी अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.