इचलकरंजीत भाजप-महायुतीचा ऐतिहासिक विजय; नूतन नगरसेवकांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गौरव

8

कोल्हापूर : इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपा महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक यशानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने नूतन नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा सोमवारी उत्साहात पार पडला. या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

इचलकरंजीच्या मतदारांनी भाजपाच्या विकासाभिमुख जाहीरनाम्यावर विश्वास दर्शवत तब्बल ४३ नगरसेवक निवडून दिले आहेत. या स्पष्ट कौलाबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इचलकरंजीकरांचे मनापासून आभार मानले. “महानगरपालिकेत महायुतीचे मजबूत सरकार स्थापन झाल्याने आता शहराच्या सर्वांगीण आणि गतिमान विकासाला नवी दिशा मिळेल,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सर्व लोकप्रतिनिधींनी एकजुटीने, पारदर्शकतेने व जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत काम करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

यावेळी आ. राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, सौ. मोश्मी आवाडे तसेच भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.