नितीन नबीन यांची भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नवीन यांची निवड करण्यात आली आहे. भाजपाकडून 16 जानेवारीपासून राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी कार्यक्रम सुरू झाला होता, त्यानुसार आज अर्ज नामांकनप्राप्त आणि पाठिंब्याच्या जोरावर नितीन नबीन 37 सेटसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. भाजपने14 डिसेंबर 2025 रोजी नितीन यांची पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती, आणि आता, तेच राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. या बद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नितीन नबीन यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन जी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा. संघटनात्मक कार्याचा प्रदीर्घ अनुभव, कार्यकर्त्यांशी असलेली थेट नाळ आणि जमीनी पातळीवरील सखोल जाण यांच्या बळावर भारतीय जनता पार्टीला आपण निश्चितच नवी ऊर्जा द्याल, असा ठाम विश्वास असल्याचे पाटील यांनी म्हटले. आपल्या यशस्वी व प्रेरणादायी कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! देखील पाटील यांनी दिल्या.
सध्या बिहार सरकारमध्ये मंत्री असलेले नितीन नबीन यांच्याकडे पथ निर्माण विभाग तसेच नगर विकास आणि आवास विभाग ही महत्त्वाची खाती आहेत. याआधी त्यांनी भाजपचे छत्तीसगड प्रभारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. 2016 ते 2019 या काळात त्यांनी भाजप युवा मोर्चाचे बिहार प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटनात्मक कामाचा ठसा उमटवला आहे.