उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील विद्यापीठांशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

13

पुणे : राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेत टिकणारे आधुनिक शिक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. याच पार्श्वभूमीवर, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील सर्व विद्यापीठांच्या विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी एका विशेष राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन पुण्यात करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

या कार्यशाळेच्या माध्यमातून उच्च शिक्षण विभागाअंतर्गत सर्व विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार, आधुनिक व भविष्योन्मुख शिक्षण देण्यासाठी सखोल वैचारिक मंथन घडेल, असा मला विश्वास असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी उच्च शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री. वेणुगोपाल रेड्डी, राज्य प्रकल्प संचालक राजेंद्र भारुड, उच्च शिक्षण विभागाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्यासह राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.