संघटनशक्ती आणि जनसेवेचा निर्धार! कोथरूडच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कार्यकर्ते सज्ज… मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सस्नेह मेळावा संपन्न

16

पुणे : कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ११ मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सस्नेह मेळावा शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. संघटनात्मक बळ अधिक दृढ करत कोथरूडच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

या प्रसंगी प्रभाग क्रमांक ११ च्या नवनिर्वाचित नगरसेविका मनिषा बुटाला तसेच भाजपाच्या लढवय्या नेत्या शर्मिला शिंदे, अजय मारणे आणि अभिजीत राऊत यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. निवडणुकीनंतरचा हा मेळावा केवळ सत्कार सोहळा नसून, येणाऱ्या काळात जनसेवेचा संकल्प अधिक दृढ करण्याचा क्षण होता.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनातून येणाऱ्या काळात प्रत्येक कार्यकर्ता निवडणुकीनंतरही जनसेवेचे हे व्रत अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.

त्याचप्रमाणे भाजपा कोथरूड मध्य मंडळ अध्यक्ष निलेश कोंढाळकर, डॉ. संदीप बुटाला, माजी नगरसेवक दिलीप उंबरकर, माजी नगरसेविका छायाताई मारणे, भाजपा नेते बाळासाहेब टेमकर, श्रीधर मोहोळ, नितीन शिंदे, अतुल शिंदे, रणजीत हरपुडे, सुरेश गोसावी, आशुतोष वैशंपायन, स्वाती मोहोळ, सुरेखा जगताप यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.