इनाम धामणीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची पदयात्रा; घरोघरी जाऊन साधला संवाद
सांगली : सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज इनाम धामणी येथे झंझावाती पदयात्रा काढली. या पदयात्रेदरम्यान त्यांनी मतदार बांधवांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटी घेतल्या आणि केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली. विकास, सुशासन आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांमुळे नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी स्थानिक पातळीवरही महायुतीची सत्ता असणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेत भाजपा-महायुतीला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले.
यावेळी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, भाजपा नेते पृथ्वीराज पवार, विलास काळेबाग, दिगंबर कोळी, सुभाष पाटील यांच्यासह भाजपा-जनसुराज्यचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.