पेठनाका वाहतूक कोंडीतून मुक्त होणार; कामेरीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली ग्वाही
सांगली : सांगली जिल्हा परिषदेच्या वाळवा तालुक्यातील कामेरी गट तसेच पंचायत समितीच्या कामेरी व ऐतवडे बुद्रुक गटातील भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कामेरी येथे भव्य जाहीर सभा संपन्न झाली. या सभेस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, सातारा–सांगली–रत्नागिरी–कोल्हापूर या चारही जिल्ह्यांना जोडणारा पेठनाका हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. वाढत्या वाहनसंख्येमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी लक्षात घेता, या रस्त्याचे रुंदीकरण करून राष्ट्रीय महामार्ग अधिक प्रशस्त करण्यात येईल व त्यामुळे पेठ परिसरातील वाहतूक समस्या कायमस्वरूपी सुटेल, असा ठाम विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी आमदार सदाभाऊ खोत, भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भाऊ पाटील, भाजपा नेते चिमणभाऊ डांगे, राहुल महाडिक, शिक्षक नेते भगवानराव साळुंखे, सी.बी. पाटील, ज्येष्ठ अभिनेते विलास लकटे, भाजपा महायुतीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.