पुणे महानगरपालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी गणेश मधुकर बीडकर यांची अधिकृत नियुक्ती… जनहिताच्या प्रश्नांना प्रभावीपणे न्याय देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा गट अधिक सक्षमपणे कार्य करेल – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : पुणे महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी गणेश मधुकर बीडकर यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक २४ (ड) मधून नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून निवडून आलेले गणेश बीडकर यांच्यावर पक्षाने ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या या नियुक्तीचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत करत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी विश्वास व्यक्त केला की, “णेश बीडकर यांच्या दांडग्या अनुभवाचा फायदा पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी होईल. महानगरपालिकेत जनहिताच्या प्रश्नांना प्रभावीपणे न्याय देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा गट अधिक सक्षमपणे आणि संघटितपणे कार्य करेल, असे म्हणत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
गणेश बीडकर यांनी यापूर्वीही पुणे महानगरपालिकेत विविध महत्त्वाची पदे भूषवली असून, त्यांची प्रशासकीय कामावरील पकड आणि संघटन कौशल्य विचारात घेऊन पक्षाने ही नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून बीडकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.