भुदरगडमध्ये महायुतीचा झंझावात; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विविध क्षेत्रातील नागरिकांशी साधला थेट संवाद

12

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भुदरगड तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी गारगोटी, खानापूर आणि मुदाळ या भागातील विविध क्षेत्रातील नागरिकांशी थेट संवाद साधला या भेटीदरम्यान त्यांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेत स्थानिक विकासाच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली.

या भेटीदरम्यान पाटील यांनी गावच्या सर्वांगीण विकासासह स्थानिक प्रश्नांवर सखोल आणि सकारात्मक चर्चा झाली. विकासाभिमुख व लोकहितासाठी सातत्याने काम करणाऱ्या नेतृत्वावर जनतेचा ठाम विश्वास असल्याचे स्पष्टपणे जाणवले. याच विश्वासाच्या बळावर येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीला निश्चितच जनतेचा कौल मिळेल, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, प्रवीण सावंत, देवराज बारदसकर यांच्यासह भाजपा–महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.