सावंतपूरमध्ये भाजप महायुतीचे शक्तीप्रदर्शन! … महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मतदारांना आवाहन

12

सांगली  :सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सावंतपूर येथे झंझावाती चौक सभा घेतली. जिल्हा परिषद दुधोंडी गट आणि पंचायत समिती रामानंदनगर गणातील भाजपा-महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सभेला संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांनी मतदार बांधवांशी थेट संवाद साधला. केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहितकारी योजनांचा पाढा वाचत त्यांनी विकासाभिमुख विचारांना साथ देण्याचे आवाहन केले. मोदी-फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विकासाचा रथ गावात पोहोचवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले

यावेळी भाजपा नेते शरदभाऊ लाड, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, जिल्हा परिषद उमेदवार अनिता पाटील, पंचायत समिती दुधोंडी उमेदवार अश्विनीताई पाटील, रामानंदनगरचे उमेदवार दीपक मोहिते, प्रल्हाद जाधव, विलास भाळेबाग, शिवाजी मगर-पाटील, मिलिंद पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.