मद्यधुंद चालकाचा बेदरकारपणा; सांगलीत ४ पोलिसांसह १६ जण जखमी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जखमींची घेतली भेट

11

सांगली, ०३ फेब्रुवारी : दोन दिवसांपूर्वी सांगली शहरात मद्यधुंद कारचालकाच्या बेदरकार वाहनचालकामुळे १६ निरपराध नागरिक जखमी झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या घटनेतील आठ जखमींना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले असून उर्वरित आठ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

यावेळी सांगली जिल्हा रुग्णालयाचे अधीष्टाता डॉ. प्रकाश गुरव, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, भाजपा नेते शेखर इनामदार व पृथ्वीराज पवार उपस्थित होते.

यावेळी पाटील यांनी जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश देखील त्यांनी पोलीस विभागाला दिले.

मध्यधुंद अवस्थेत असलेला एका कार चालकाने आपल्या इनोव्हा गाडीने चौकात उभ्या राहणाऱ्या 15 ते 16 जणांना धडक दिल्याचा प्रकार घडला. यामध्ये सामान्य नागरिकांसह जवळच असलेल्या रिक्षा स्टॅंडवरील लोकांना, तसेच चार ते पाच पोलिसांना देखील धडक दिली. सांगलीत कृष्णामाई महोत्सव सुरु असताना बंदोबस्तासाठी उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांना इनोव्हा कारने धडक दिली. पटेल चौकमार्गे, गणपती मंदिर मार्गे तो टिळक चौकाकडे येत होता. मोठी गर्दी होती, पोलीस ट्रॅफिक क्लिअर करत असताना हा प्रकार घडला.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.