विकासकार्याचा वेग अधिक वाढवण्यासाठी सांगली जिल्हा परिषद व पंचायत समितीत भाजपा महायुतीला विजयी करा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

6

सांगली : सांगली जिल्हा परिषदेच्या वांगी गट तसेच पंचायत समितीच्या वांगी व नेवरी गण येथील भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सावंतपूर येथे भव्य चौक सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून मतदार बांधवांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकार सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवत आहेत. या विकासकार्याचा वेग अधिक वाढवण्यासाठी सांगली जिल्हा परिषद व पंचायत समितीत भाजपा महायुतीला विजयी करण्याचे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.

या प्रसंगी भाजपा नेते शरदभाऊ लाड, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, जिल्हा परिषद उमेदवार स्नेहा महाडीक, पंचायत समिती वांगीच्या उमेदवार मनिषा पाटील, नेवरी गणाचे उमेदवार लक्ष्मण कणसे, तसेच महायुतीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.