सांगलीत भाजपकडून महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गजानन मगदूम यांची उपमहापौर पदासाठी सर्वानुमते उमेदवारी निश्चित – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

20

सांगली : सांगली येथे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संयुक्त बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत भाजपकडून महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गजानन मगदूम यांची उपमहापौर पदासाठी सर्वानुमते उमेदवारी निश्चित करण्यात आली. पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी मंत्री आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, भाजपा नेत्या जयश्री वहिनी पाटील, शेखर इनामदार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे, गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

महापालिकेत भाजपला 78 पैकी सर्वाधिक 39 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 18, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 3, शिवसेनेला 2 जागा मिळाल्या आहेत. महापालिकेत सत्तास्थापनेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची युती झाली आहे. त्यामुळे महायुतीचे संख्याबळ 55 झाले आहे. शिवसेना देखील महायुतीसोबत आहे. त्यामुळे महायुतीकडे बहुमत आहे. महायुतीच्या सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यानुसार महापौर पद भाजपला, उपमहापौर पद राष्ट्रवादीला मिळणार आहे. स्थायी समितीचे सभापती पदही भाजपकडेच राहणारअसल्याची माहिती देण्यात आली. महापौर पदासाठी पहिले सव्वा वर्ष धीरज सूर्यवंशी यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, महापालिकेत भाजप-राष्ट्रवादी अजित पवार युती झाली आहे. या युतीत शिवसेनाही असणार आहे. त्यामुळे महायुतीचे संख्याबळ ५७ होते. याउलट विरोधी काँग्रेसकडे 1८ आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे ३, असे एकूण २१ संख्याबळ आहे. काँग्रेसने मंगळवारअखेर महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज नेला नव्हता. काँग्रेसचा अजून गटनेताही निश्चित झालेला नाही. महापौर, उपमहापौर पदाचा उमेदवार कोण असणार, हेही निश्चित झालेले नाही.

पाटील पुढे म्हणाले, अजित पवार यांच्या निधनाने पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजप विरोधात महापौर निवडीत अर्ज न भरता बिनविरोध निवड करण्यात आली, त्याच प्रमाणे सांगलीतही निवड बिनविरोध व्हावी, असे आवाहन मी काँग्रेसला करणार आहे, याबाबत खासदार विशाल पाटील यांच्याशी बोलणार आहे, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.