माडग्याळ मेंढी प्रगतीचा नवा मार्ग; धनगर समाजाच्या हक्कांसाठी सरकार कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

14

सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील जाडरबोबलाद जिल्हा परिषद गट व माडग्याळ पंचायत समिती गणातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माडग्याळ परिसरात आयोजित जाहीर सभेत मतदार बांधवांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश व राज्य झपाट्याने प्रगती करत आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजना व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे ग्रामीण भागातील लाखो कुटुंबांना थेट दिलासा मिळत असल्याची माहिती यावेळी पाटील यांनी मतदार बांधवाना दिली.

पाटील म्हणाले, पशुपालन क्षेत्रात सांगली जिल्ह्याने निर्माण केलेली ओळख अभिमानास्पद असून ‘माडग्याळ’ मेंढी मेंढपाळ बांधवांसाठी प्रगतीचा नवा मार्ग ठरत आहे. धनगर समाजाच्या हक्कांसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वातून मिळालेली ताकद आणि माडग्याळसाठी मंजूर झालेले आरटीओ कार्यालय हा विकासाचा ठोस टप्पा आहे.

राज्य आणि केंद्रात भाजपाचे सरकार असल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीतही भाजपाचे उमेदवार विजयी झाल्यास ‘डबल इंजिन’ सरकारच्या माध्यमातून विकास निधी थेट गावागावात पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करत सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी, उमेदवार भाग्यश्री तेली, मंगलाताई बंडगर, रेणुका आराणी तसेच भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.