मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या कार्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली दाद; शितल लोंढे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
सांगली : महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी स्वर्गीय मदनभाऊ पाटील युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष शितल लोंढे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान युवा मंचाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
युवा मंचच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांविषयी जाणून घेताना विशेष समाधान वाटले. युवकांच्या सहभागातून समाजहिताची चळवळ अधिक बळकट होत असल्याचे पाहून आनंद झाला, असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. पालकमंत्र्यांनी शितल लोंढे आणि त्यांच्या टीमसोबत आगामी काळातील सामाजिक प्रकल्पांबाबत अनौपचारिक चर्चा केली आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
या प्रसंगी भाजपा नेत्या जयश्री वहिनी पाटील यांच्यासह युवा मंचचे सर्व पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.