दैनिक ‘ललकार’च्या ध्येयवादी पत्रकारितेचा वारसा कौतुकास्पद; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून गौरव
सांगली : सांगली येथे दैनिक ललकारच्या कार्यालयास आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संपादक सुभाष खराडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमसोबत विविध विषयांवर अनौपचारिक संवाद साधत दैनिक ललकारची प्रेरणादायी वाटचाल पाटील यांनी जाणून घेतली.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, स्वातंत्र्योत्तर काळात अत्यंत खडतर परिश्रमातून संस्थापक संपादक बापूराव खराडे यांनी हे दैनिक नावारूपाला आणले. आज त्यांच्या कार्याचा वारसा तिसरी पिढी समर्थपणे पुढे नेत आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजजागृतीचे कार्य अधिक बळकट होत राहो, अशी सदिच्छा पाटील यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी भाजपाचे केदार खाडिलकर, माजी जिल्हा खजिनदार अजित अडवाणी, माजी कामगार आघाडी अध्यक्ष राजेश बनसी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.