सांगलीत भाजपच्या नवनिर्वाचित सदस्यांचा विजयोत्सव; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गौरव

11

सांगली : भारतीय जनता पार्टीच्या वतीने सांगली जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांच्या अभिनंदन सोहळ्याचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत विकासाच्या कामांना गती देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे,अशी अपेक्षा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. गावपातळीवर प्रलंबित असलेले प्रश्न सोडवणे आणि सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे ही नवनिर्वाचित सदस्यांची प्राथमिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सांगली जिल्ह्यातील भाजपच्या विजयाचा जल्लोष या सोहळ्यात पाहायला मिळाला. नवनिर्वाचित सदस्यांचे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी आमदार सुरेश भाऊ खाडे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक, पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, सांगलीचे महापौर धीरज सूर्यवंशी यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख भाजपा नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.