शहराच्या मध्यवर्ती जागेत महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नावाने स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी उभारावी – तुषार हिंगे

40

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज शहराचे माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक तुषार हिंगे यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यवर्ती जागेत महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नावाने अद्यावत स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी उभारावी हि मागणी केली आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी निश्चितच हे एक महत्वाचे पाऊल ठरेल हा विश्वास हि यावेळी त्यांनी व्यक्त केला.

आज अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रभाग व पिंपरी चिंचवड शहराच्या जनतेच्या समस्या व उपाययोजना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडत असताना पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यवर्ती जागेत महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नावाने अद्यावत स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी उभारावी हि मागणी हिंगे यांनी केली. यासोबतच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात राज्यशासनाने ज्या प्रकारे राज्य सरकारच्या सर्व विभागांना १०० दिवसांचा एक कार्यक्रम देऊन त्यांचे मूल्यांकन केले, त्याचप्रमाणे माननीय महापौरांनी देखील विविध समित्यांना पुढील १०० दिवसांचा कार्यक्रम देऊन त्यांचे मूल्यांकन करावे हि देखील सूचना करत शहराचा पाणी प्रश्न लक्षात घेता शहर नजीकच्या टाटा डॅम मधील पाणी शहराला उपलब्ध कसे करता येईल या संदर्भात एक समिती स्थापन करून टाटा कंपनी व्यवस्थापनासोबत चर्चा सुरु कारण्याची देखील विनंती यावेळी हिंगे यांनी महापौरांना केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.