कोणत्याही कार्यकर्त्यासाठी पक्ष कार्यालय हे केवळ एक वास्तू नसून ते एक ‘घर आणि मंदिर’ असते, जिथून जनसेवेसाठी एक सकारात्मक ऊर्जा मिळते – मंत्री चंद्रकांत पाटील

8

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सदिच्छा भेट दिली. पक्षाचे हे अतिशय प्रशस्त आणि सर्व सुविधांनी युक्त कार्यालय पाहून मनस्वी आनंद झाला. खरं तर, कोणत्याही कार्यकर्त्यासाठी पक्ष कार्यालय हे केवळ एक वास्तू नसून ते एक ‘घर आणि मंदिर’ असते, जिथून जनसेवेसाठी एक सकारात्मक ऊर्जा मिळते, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी समाधान व्यक्त करताना पाटील म्हणाले, छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर विराजमान झाला, ही आपल्या सर्वांसाठीच अत्यंत आनंदाची बाब आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी सत्तेचा उपयोग सामान्यांच्या प्रश्नांसाठी करून समाजकारणावर भर द्यावा, असे आवाहनही यावेळी पाटील यांनी केले. याप्रसंगी महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व नवनियुक्त नगरसेवकांचे पाटील यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या भेटीदरम्यान मंत्री अतुल सावे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रवीण घुगे, शहराध्यक्ष किशोर शितोळे, गोविंद केंदे, सरचिटणीस छायाताई खाजेकर, महिला मोर्चा शहराध्यक्ष उज्वलाताई दहीफळे, विवेक देशपांडे, ताराचंद गायकवाड यांच्यासह भाजपाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.