भटक्या कुत्र्यांचे निर्बीजिकरण व लसीकरण मोहीम अधिक प्रभावीपणे राबवा, महापौर रवी लांडगे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी नुकताच पशुवैद्यकीय विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. संदर्भातील पशुवैद्यकीय विभागाची आढावा बैठक मंगळवारी संपन्न झाली. शहरातील भटक्या प्राण्यांचे व्यवस्थापन, लसीकरण, निर्बीजिकरण, प्राणी कल्याण तसेच नागरिकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी भटक्या कुत्र्यांचे निर्बीजिकरण व लसीकरण मोहीम अधिक प्रभावीपणे राबविणे, नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करणे, तसेच प्राणी कल्याणाच्या दृष्टीने महापालिकेच्या पशुवैद्यकीय सेवांना अधिक सक्षम करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. तसेच प्राणीमित्र संस्था आणि महापालिका प्रशासन यांच्यात अधिक समन्वय ठेवून कामकाज राबविण्याबाबतही मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.
यावेळी उप महापौर शर्मिला बाबर, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, नगरसदस्य अनंत कोरहाळे, नगरसदस्या वैशाली काळभोर, नगरसदस्या वैशाली घोडेकर, नगरसदस्य सुहास कांबळे, नगरसदस्य मंदार देशपांडे, नगरसदस्य उत्तम केंदळे, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उप आयुक्त संदीप खोत, डॉ. अरुण दगडे तसेच विविध संस्थांचे प्राणीमित्र आणि महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेपासूनच शहरातील भटक्या कुत्रांच्या प्रश्नावर अनेक लोकप्रतिनिधीं आवाज उठवला होता.
